शेतकरी योजना

शेतमाल तारण कर्ज योजना

कृषि उत्पन्न बाजार समिती, गडचिरोली येथे शेतकऱ्यांसाठी शेतमाल तारण कर्ज राबविण्यात येते , शेतकऱ्यांनी आपला शेतमाल वखार केंद्र गडचिरोली येथील गोदामत साठवनूक केल्यानंतर मिळालेली वखार पावती बाजार समितीमध्ये सादर केल्ल्यानंतर व तारण कर्जासाठी मागणी अर्ज भरून दिल्यानंतर बाजार समिती कडून सदर वखार पावती व बोझा चढवून शेतमाल किमतीच्या 75 % तारण कर्ज द.सा. द.शे. 6%; या दराने पुढील 180 दिवसांकरीता कर्ज उपलब्ध्‍ करुन दिल्या जाते काही कारनास्तव शेतमालास योग्य बाजार भाव न मिळाल्यास माल विक्री न झाल्यास पुढील जादा कालावधासाठी द.सा.द.शे 8 % व्याजाची आकारणी करण्यात येते. सदर कालावधी मध्ये शेतमालास चांगला दर मिळून शेतकऱ्यांना चांगला आर्थिक लाभ प्राप्त होतो. त्यामुळे या योजनेकडे शंतकऱ्यांचा चांगला प्रतिसाद दिसुन येत आहे. बाजार समिती गडचिरोली ही मागील 25 वर्षापासून हि योजना चांगल्या रितीने राबवित आहे.